'ABHA' Health Card - 'आभा' हेल्थ कार्ड
काय आहे ‘आभा’ हेल्थ
कार्ड’ ?
‘आभा’ हेल्थ
कार्ड चा नेमका फायदा काय ?
“आभा हेल्थ कार्ड
ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे," असं
म्हणत हे कार्ड
बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.
या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.
आभा (ABHA) हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड
एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14
अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना
माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल
या हेल्थ कार्डमध्ये आपली सगळी माहिती डिजिटली ठेवली जाणार आहे. या माहितीला एका सर्व्हरवर एकत्र केलं जाणार आहे.
‘आभा’ हेल्थ कार्ड चा फायदा काय ?
@ उपचारासाठी सर्वत्र रिपोर्ट किंवा स्लिप घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.
@ यामध्ये तुमचा रक्तगट आजार किंवा त्रास औषधी आणि डॉक्टर यांच्याशी संबंधित सर्व माहिती असेल.
@ तुम्ही तुमची सर्व सर्व वैद्यकीय नोंदणी जसे की लॅब रिपोर्ट डिस्क्रिप्शन्स आणि निदान करू शकता.
@ ऑनलाइन उपचार टेलीमेडिसीन खाजगी डॉक्टर इ फार्मसी आणि वैयक्तिक आरोग्य नोंदणी यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
@ या कार्डाला विमा कंपनीशी लिंक करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल.
@ रुग्णालये दवाखाने आणि विमा कंपनीसह वैद्यकीय
नोंदी सहज शेअर करता येतील.
@ वैद्यकीय उपचारांसाठी खूप लाभदायक ठरणारं हे ABHA कार्ड.
आभा कार्डबनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
@ आधार
कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
@ मोबाईल नंबर
अशा अनेक वेगवेगळ्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://siddhai23.blogspot.com/ या वेबसाईटला भेट द्या folow करा .
