
भारतामध्ये
प्रत्येक व्यक्तीसाठी मतदान ओळखपत्र (VOTER CARD) खूप महत्वाचं आहे. आधार कार्ड (AADHAR
CARD) व पॅन कार्ड (PAN CARD) प्रमाणेच मतदान ओळखपत्र (Voter
ID Card) हे एक आवश्यक
दस्तावेज आहे. भारतीय नागरिक ज्याचे वय कमीत कमी 18 वर्षे आहे तो मतदान ओळखपत्र (Voter
ID Card) बनवू शकतो.
यामध्ये तुमच्या कायमचा पत्ता दिलेला असतो. मतदान ओळखपत्र (Voter
ID Card) बनवण्याकरता
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
तुमच्याकडे मतदान ओळखपत्र (Voter
Card ) नसेल तर
तुम्ही तसेच जर तुमच्या मतदान ओळखपत्रात (Voter Card) चूक असेल तर तुम्हाला शासकीय कार्यालयांमध्ये
रांगा लावण्याची गरज उरणार नाही. कारण, तुम्ही घर बसल्या मतदान ओळखपत्रातील (Voter
Card ) चूक
दुरुस्त करु शकता. घरी बसून मतदार ओळखपत्रा मध्ये (VOTERCARD) मोबईल वरून
सुद्धा मतदार आयडीचा (VOTER
CARD) फोटो, पत्ता किंवा नाव सहज बदलू शकता.

कसा कराल ऑनलाइन अर्ज?
→ भारतीय निवडणूक आयोगाच्या
https://eci.gov.in
या अधिकृत वेबसाइटवर जा.
→ त्याठिकाणी मतदाता सेवा
पोर्टलवर https://www.nvsp.in क्लिक करा.
→ त्याठिकाणी नवीन नोंदणीच्या
ऑनलाइन अर्जावर क्लिक करा.
→ मोबाइल क्रमांक आणि ईमेल
आयडीने रजिस्ट्रेशन करून फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करा.
→ त्यानंतर फॉर्म 6 सिलेक्ट
करून तो काळजीपूर्वक भरा.
→ याठिकाणी तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता ही माहिती द्यावी
लागेल.
→ ज्यावर स्टारचे चिन्ह असेल तिथे आवश्यक तपशील भरणे बंधनकारक आहे.
→ यानंतर तुमच्या जवळ असलेल्या कागदपत्रांची स्कॅन फाईल अपलोड करावी.
→ फॉर्म भरल्यानंतर ठिकाण
आणि तारीख नमूद करावी.
→ सर्व कागदपत्र जोडून झाल्यावर सबमिटवर क्लिक करा.
⇨ हे हि वाचा ⇦
घरबसल्या १० मिनिटांत मिळवा लायसन्स
आधार कार्ड अपडेट करताय;तर हे वाचा
मोबाइलवरून ‘आधार कार्डवर’ स्वतः करा असा ‘बदल’.
PAN CARD : पॅन कार्ड विषयी सर्व काही
रेशन कार्ड बद्दल सर्व काही
कोणती कागदपत्र आवश्यक?
→ एक पासपोर्ट साइझ फोटो
→ ओळखपत्रासाठी तुम्ही
जन्म दाखला, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा हायस्कुल मार्कशीट अपलोड करू शकता.
→ पत्त्याच्या
दाखल्यासाठी रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, फोन किंवा वीज-पाणी बिल
देऊ शकता.
महिनाभरात मिळेल मतदान ओळखपत्र…….
ही संपूर्ण प्रक्रिया
पूर्ण केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर विभागाकडून एक लिंक पाठवली जाईल. ज्या
माध्यमातून तुम्ही वोटर आयडीचे स्टेटस चेक करू शकता. साधारण महिनाभराच्या
कालावधीमध्ये तुमचे मतदान ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचेल.