SSC Result 2023
दहावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची (SSC Result 2023) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची (SSC Result 2023) घोषणा ऑनलाइन उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. 10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइटवर कसा पहायचा
स्टेप 1: mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, ‘एसएससी परीक्षा निकाल 2023’
(SSC Result 2023) वर क्लिक करा.
स्टेप 3: आपली माहिती भरून लॉगिन करा.
स्टेप 4: परिणाम प्रदर्शन स्क्रीनवर दिसून येईल.
स्टेप 5: आपला निकाल डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट आउट घ्या.
---- सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा ----

