दहावी नंतर कोणकोणते पर्याय असतात?
दहावी
नंतर तुम्ही विज्ञान, वाणिज्य, कला, डिप्लोमा, ITI आणि
काही कौशल्य विकसित करणारे कोर्स करू शकता.
10 वी नंतर
शिक्षणाच्या मुख्य 4 प्रकार आहेत.
1. विज्ञान (Science)
2. वाणिज्य (Commerce)
3. कला (Arts)
4. प्रोफेशनल कोर्स (Independent Career Options)
१) विज्ञान (Science) :-
Science घेतल्यावर
पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer
Science, ITआणि बरेच काही.विज्ञान शाखे मधे प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला
कमीत कमी ५० % मार्क लागतात तसेच हा कोर्स २ वर्षाचा आहे व भाषा विषय सोडल्यास
बाकीचे सगळे विषय इंग्रजीतुन असतात.
दहावी नंतर विज्ञान घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी झाल्यावर जवळजवळ कोणत्याही
कोर्सला प्रवेश घेऊ शकता.
विज्ञान मधुन बारावी पुर्ण झाल्यावर तुम्ही
खालील ठिकाणी प्रवेश घेऊ शकता :- बी एस सी (विज्ञान), बी एस
सी (कृषी), बी एस
सी (तांञिक), औषधनिर्मीण पदवी,
इंजिनिअरींग पदवी, वैधकीय पदवी, IIT& JEE प्रवेश
परिक्षा व NDA आर्मी ,नेव्ही
व एअरफोर्ष प्रवेश परिक्षा तुम्ही PCM विषय
घेतले तर तुम्ही इंजिनियरिंग करू शकता, architecture कोर्स
करू शकता, आणि बरेच कोर्स करू शकता. तुम्ही PCB विषय
घेतले तर तुम्ही MBBS, नर्सिंग सारखे कोर्स करू शकतात.
२) वाणिज्य
(Commerce) :-
या शाखेमधे प्रवेश घेण्यासाठी कमीत
कमी मार्कची गरज नसते. या शाखे मधे गणित व अकडेमोड जरा
जास्त असते हा कोर्स दोन वर्षचा आहे. यामध्ये
आपल्याला इंग्रजी किंवा मराठी माध्यमाची निवड करता येते. 10 वी
नंतर कॉमर्स क्षेत्रात वेगळेच फायदे आहेत सायन्स पेक्षा प्रसिद्ध कॉमर्स आहे.
वाणिज्य मधुन बारावी झाल्यावर तुम्ही खालील ठिकाणी पाञ आसता चॅरटेड अकांऊटट, बी कॉम, बी बी
ए,
बी सी ए , वकिली व NDA आर्मी
प्रवेश परिक्षा तसेच कला शाखेचे सर्व कोर्सेस दहावी नंतर वाणिज्या स्ट्रीम
घेतल्यावर तुम्हाला बारावी नंतर BBA, B.Com सारखे
कोर्स करतात येतात. या क्षेत्रात करियर ऑप्शन्स Finance, Planning,
Accountancy, Tax Practitioners, Broking, Banking इ.आणि
बरेच आहेत.
३) कला (Arts) :-
कला या शाखेमधे प्रवेश घेण्यासाठी
तुम्हाला किमान मार्काची मर्यादा नाही.
तुम्हाला कितीही मार्क अलतील तरी तुम्ही प्रवेश घेऊ शकता.या शाखेचा अभ्यासक्रम २
वर्षाचा असतो व तो मराठीतुन असतो.दहावी
नंतर कला विभाग घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी
झाल्यानंतर खालील ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. बी ए, बी सी
ए,
बी बी ए, वकिली, ग्राफीक्स
डिझायन पदवी, पञकारिता पदवी, सिनेमा
कलाकर पदवी, तसेच NDA आर्मी च्या प्रवेश परिक्षेला पण
तुम्ही पाञ आसता. या विषयाची निवड बरेच विध्यार्थी यासाठी करतात की पुढे स्पर्धा
परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळतो.
४) प्रोफेशनल
कोर्स (Independent
Career Options) :-
a) Polytechnic
Courses काय आहे?
polytechnic courses हा एक प्रकारचा technical
course आहे ज्या मध्ये विद्यार्थ्यांला practical
training दिली जाते आणि विद्यार्थ्यांचे स्किल develop केले
जाते polytechnic courses हा तीन वर्षाचा
रेग्युलर कोर्स आहे. ह्या कोर्स ला अश्या प्रकारे डिझाईन
केलेले असते की विद्यार्थ्यांचा संपूर्ण फोकस practical knowledge दिलेला
असतो.
b) 10 वी
नंतर ITI :-
10 वी च्या नंतर ITI हे एक
चांगला पर्याय आहे. ITI काय
आहे ? या कोर्स मध्ये विद्यार्थ्याचे industrial
training आणि स्किल वर जास्त फोकस दिला जातो यामध्ये भरपूर कोर्स
दिले गेले आहेत.त्यांना trends म्हणतात.ITI कोर्स
८ वी पासून ते १२ वी पर्यंत कोणीही करू शकतो.
ITI चे
मुख्य दोन प्रकार
• Government ITI (सरकारी
ITI)
• Private ITI(खाजगी
ITI)
c)
10 वी
नंतर डिप्लोमा (diploma) :-
10 वी नंतर शिक्षण चालू ठेवायचे आहे? तर तुमच्यासाठी diploma हा एक
चांगला विकल्प आहे . कमी खर्चा मध्ये तुम्ही टेक्निकल
शिक्षण घेऊ शकता. आणि diploma चे
शिक्षण घेतल्याने तुम्हाला लवकर नोकरी मिळू शकते.

