दहावी नंतर काय ? (भाग-१) 

      दहावी नंतर योग्य कोर्स निवडणे खूप महत्वाचे आहे कारण दहावी ही  आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे. 10 वी नंतर काय करावे ? दहावी नंतर कोणते शिक्षण घ्यावे ? दहावी नंतर चे कोणते कोर्स योग्य असतील ? असे भरपूर प्रश्न दहावीचा निकाल लागल्यानंतर पालक व विद्यार्थांना पडलेला असतो.

      सध्याच्या काळात विद्यार्थ्यांसमोर करिअरचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. करिअर निवडताना  ते करिअर तुम्हाला जमणार आहे का ? आर्थीकदृष्टय़ा ते किती योग्य आहे ? स्वत:च्या शारीरिक क्षमतांचा विचार करण ही आवश्यक आहे. या सर्व प्रश्नामुळे  गोंधळ होणं स्वाभाविक आहे.
       करीयर निवडताना सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची आवड. तुम्हाला काय आवडतं किंवा काय व्हावंसं वाटतं ? करिअर असं असावं जे तुम्हाला आवडतं. अनेकदा तुमचा छंद हेच तुमचं करिअर होतं. पण तुमच्या आवडीला बाजारात किती मागणी आहे हे ही पाहणं गरजेचं आहे.
       मुलाच्या करिअर निवडीत पालकांनी त्यांच्यावर दबाव आणू नये. आपल्या पाल्याची आवड काय आहे, ते समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करावं. आपला पाल्य चुकीचा निर्णय घेत असल्यास त्याला योग्य मार्ग दाखवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

१० वी नंतर शिक्षणाच्या मुख्य प्रकार आहेत.

1.      विज्ञान (Science)

2.      कला (Arts)

3.      वाणिज्य (Commerce)

4.      प्रोफेशनल कोर्स (Independent Career Options)

दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण पुढील ब्लॉग मध्ये माहिती करून घेवू.