जेनेरिक औषधे 

           आजाकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समजातील प्रत्येक वर्गातील आजारांचे  प्रमाण वाढत आहे.गरीबांनादेखील या आजारांशी सामना करताना औषधं सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता जेनरिक औषधांचा पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर जेनेरिक औषधे म्हणजे नेमके काययाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

>

जेनरिक औषधं म्हणजे काय ?

         एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधल्या गेलेल्या फोर्मुल्यानुसार औषध तयार केले जाते. प्रत्यक्ष औषधाचे उत्पादन करण्याचा खर्च कमी असला तरी संशोधनावर केलेला खर्च भरून काढणे कंपनीला आवश्यक असते. यासाठी या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी फक्त त्या कंपनीलाच देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावाने (ब्रॅण्ड नेम) बाजारात विकली जातात.

         या कालावधीत संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर इतर औषध कंपन्याही ही औषधे तयार करू शकतात. थोडक्यात ब्रॅन्ड नेम नसलेली पण औषधांचा सारखाच फॉर्म्युला वापरून बनवलेल्या गोळ्यासिरप म्हणजे जेनरिक औषधं.

>

जेनरिक औषधं स्वस्त कशी ?

         ब्रॅन्डेड औषधांची किंमत त्यावर होणारी प्रसिद्धीजाहिरातबाजीटॅक्स अशा विविध घटकांमुळे वाढते.जेनरिक औषधांबाबत लोकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत.जेनरिक औषधांसाठी जाहिरातकर किंवा केमिस्टपर्यंत पोहचवण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च नसल्याने ब्रॅन्डेड औषधांच्या तुलनेत जेनरिक औषधं स्वस्त असतात.

        जर एखादी ब्रॅन्डेड पेनकिलर गोळी सुमारे 15-20 रुपये असल्यास त्याची जेनरिक औषधाची गोळी सुमारे 4-8 रूपयांची असू शकते. साधारणंपणे 30-90% किंमतीत फरक आढळू शकतो. जेनरिक आणि ब्रॅन्डेड गोळ्यांमध्ये औषधांचा फॉर्म्युला सारखाच असतो. औषधांच्या किमतीचा त्याच्या गुणधर्माशी किंवा प्रभावीपणाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे जेनरिक औषधं स्वस्त म्हणजे कमी प्रभावी हा तुमच्या मनातील गैरसमज आजच दूर करा.

>