आर्थिक
व्यवहार सुरू राहणे ही अत्यावश्यक बाब आहे, म्हणून
लॉकडाउनमध्येही बँकांची सेवा सुरू ठेवली जाते. पण राज्यातील कोरोनाच्या वाढत्या
पार्श्वभूमीवर तसेच बँकांचे कर्मचारीही करोनाबाधित होत असल्यामुळे अनेक
राज्यांमध्ये बँकांची वेळ कमी केली आहे.
राज्यस्तरीय बँकर्स
समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्रातील
इतर भागातील बँकांनी त्यांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्रातील सर्व बँका30 एप्रिल
पर्यंत सकाळी10 ते दुपारी2 या वेळेतच ग्राहकांसाठी सेवा देणार आहेत. तसेच सर्व
नियमांचे पालन करून आवश्यक तीच सेवा पुरविली जाणार आहे.
पैसे भरणे किंवा काढणे, आरटीजीएस, विविध सरकारी भरणा अशा
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाणार आहे. बॅलेन्स चेक करणे, पासबुक पाहणे, पैसे ट्रान्स्फर करणे
इत्यादी तत्सम सेवासाठी ऑनलाईन-गुगल पे, फोन पे, तसेच नेट बँकिंग पद्धतीचा वापर करून ग्राहक असे व्यवहार
घरच्या घरी करू शकतात.
जरी ग्राहकांसाठी वेळ कमी
करण्यात आली असली तरी कर्मचार्यासाठी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत बँका सुरू
राहतील. राज्य सरकारच्या नियमानुसार बँकांमध्ये आता ५० टक्के कर्मचारी उपस्थित
राहतील तर ५० टक्के कर्मचार्यांना'वर्क फ्रॉम होम' देण्यात येणार आहे.
कर्मचार्याना कोव्हिडच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश येत्या १५ मेपर्यंत
लागू राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, तसेच सहकारी बँकांनाही हे नियम लागू असतील.