जांभूळ
जांभूळ
उन्हाळ्याच्या शेवटी व
पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले
दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म
ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे
ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो.

जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे
बनवण्यासाठी करण्यात येतो. हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य
विकारात अतिशय लाभदायक आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात...
● ज्यांची रोगप्रतिकारशक्ती
कमी आहे अशा लोकांनी दिवसातून दोन वेळा जांबळे खाल्ली पाहिजेत.
● यात फ्लावोनाईड्स भरपूर
प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास
मदत करतात.
● जर आपल्याला मुळव्याधाचा
त्रास असेल तर दररोज जांभळे खा. काही दिवसांमध्येच तुमचा मुळव्याधाचा त्रास गायब
होईल.
● पचन संस्था स्वच्छ
करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं.
● यातील अल्कोलीड्स केमिकलमुळे
स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण
नियंत्रित राखले जाते.
● जर आपल्याला गॅस्ट्रिक
समस्येमुळे त्रास होत असेल तर, जांभळाच्या बिया वापरल्यास
या समस्येपासून आराम मिळू शकेल.
● तुमच्या दात आणि हिरड्या
कमकुवत झाल्या असतील तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. यामुळे
आराम मिळेल.
● मधुमेहासोबतच रक्तदाबाचा
त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे.
● जांभळाची बी पाण्यात उगाळून
चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुमे बरे
होण्यास मदत होते.
सावधानता
–
जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या
पोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व
अशा वेळी जेवण जात नाही. तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित
पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत
उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो.