माणुसकी जपा...........

                 कोणासाठी आयुष्य सुंदर असतं, सुखी-समृद्ध असतं, तर कोणासाठी हेच आयुष्य भाकरीचा तुकडा शोधण्यात निघून जातं. मग ज्यांच्याकडे आहे, त्यांनी माणसाला माणूस म्हणून आधी मदत करावी.कारण आयुष्यात माणुसकीच मोठी आहे पैसा नाही; पण आज जीवनात पैसा मोठा झाला आहे.पैशापुढे माणूस मात्र शून्यवत वाटतो, तुम्ही कितीही पैसा कमवा, धनदौलत कमवा; पण याचा उपयोग गरीब लोकांसाठी झाला नाही, तर काय फायदा? कित्येक लोकांना पैशाचा अहंकार असतो. अलीकडे तर माणसाचे राहणीमान, कपडेलत्ते या सर्व बाबींवर माणसाची प्रतिष्ठा तोलली जाते. माणूस जन्माला येतो तर काय घेऊन येतो, त्याला काहीच माहीत नसते. पैसा काय आहे, आणि माणूसपण काय आहे ते जर का त्याला लहानपणापासूनच समजावून सांगितले, नीतिमूल्ये शिकवली, तर त्याला माणूसपण मोठे वाटू लागेल, पैसा नाही.

                मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहेत्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.आपण किती ही मेलेल्या माणसांना (प्रेताना) खांदा दिला. "यापेक्षा" किती जीवंत माणसांना हात दिला.यावर आपली माणूसकी ठरत असते."माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत?खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय/पुरल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत खरतर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, तु मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यासाठी माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय.म्हणुनच म्हणतोय जीवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या,एखाद्याला" तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून, तुझं माझं सोडून माणुस व्हा! मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल.