दुःखाला स्वताः सामोर जा.....

                                     आयुष्यात एखादा क्षण असा येतो कि,त्यावेळी वाटतं कि याहुन जास्त दुःखदायी,वेदनादायी आयुष्यात काहिच असु शकत नाही.या वेळच्या मानसिक अवस्थेत आपण इतके गुरफटुन जातो कि आपण सतत उदास व चिंतेत राहु लागतो.आपल्या जवळचे लोक आपल्याला त्या परीस्थितीतही सावरण्याचा प्रयत्न करत असतात.पण आपलं मन असं असतं कि त्या वेदनादायी आठवणीतच अडकुन पडलेलं असतं.यातुन बाहेर‌ पडावे अशी इच्छा असतानाही मन मात्र इतकं हरलेलं असतं कि कोणाचंही ऐकायला,काहीही करायला ते‌ तयार नसतं व आपल्याला सोप जगणंही कठीण होऊन बसतं.

                                    अशावेळी जाणुन-बुजुन किंवा ठरवुन का होईना जरा एकांतात बसा,डोळे मिटा,आपल्या आयुष्यातल्या सुखदायी आठवणी किंवा आपल्या जिवनातले आनंददायी,हसरे,खरोखरचे खुशीचे अविस्मरणीय क्षण आठवा आणि वारंवार आठवत रहा तेव्हा एखादा सेकंद असा येतो कि आपण सध्या असलेल्या वेदनादायी भावना त्याक्षणी विसरलेलो असतो.ओठावर एक छानशी स्माइल किंवा डोळ्यांत आनंदाश्रु आलेले असतील.जेव्हा डोळे उघडाल तेव्हा कदाचित त्याच वेदनादायी विश्वात परत जाल.पण विश्वास ठेवा आपण स्वतःच स्वतःची मदत करू शकतो.हेच ते क्षण ह्याच त्या आठवणी असतात.ज्या आपल्याला त्या वेदनादायी परीस्थितीतुन बाहेर काढु शकतात.ज्या आपल्याला दुःख विसरायची प्रेरणा देतात.सुख देतात उभं राहायची,पुढं जायची,जगायची हिम्मत देतात. मन तर चंचल आहेच हो!ते क्षणोक्षणी बदलत असतं.

                                   आठवणी येणं जरी आपल्या हातात नसलं तरीही आपण त्याला चांगल्या आठवणींत रमवलं कि वाईट आठवणींना यायला आपोआपच जागा राहणार नाही.परीस्थिती कोणतीही असो आपलं मन त्यावर काय आणि कसा विचार‌ करतं तश्याच भावना तयार होतात व तसाच परीणाम घडवतात. सुख देणाऱ्या भावना असतील तर छानच पण दुःख देणाऱ्या असतील तर आपण स्वतःसाठी हा छोटासा प्रयत्न किंवा प्रयोग तर नक्किच करू शकतो ना!....