गुढीपाडवा

               भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्वपावित्र्य आणि इतिहास आहे. आणि अशाच काही सणांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा.चला तर मग गुढीपाड्व्याबद्दलची माहितीधार्मिक महत्वआणि गुढीपाडव्याचा इतिहास जाणून घेऊया.

          
दसरागुढीपाडवाअक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त. असा साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा!

           कोणतही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केल्या जाते. सोन्याची खरेदीनव्या वास्तुत गृहप्रवेशव्यवसायाला प्रारंभ अश्या महत्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा या दिवशी सुरूवात केली जाते.
         गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्यातोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. 
           
गुढी उभारण्यासाठी बांबूची किंवा कळकाची मोठी काठी वापरली जाते.त्या काठीला कोमट पाण्याने स्वच्छ धुतले जाते. नंतर काठीला चंदनाचा लेप आणि हळद कुंकू लावले जाते. काठीला वरील बाजूस नवीन वस्त्र , चाफ्याच्या फुलांचा हारआणि साखरेची माळ लावली जाते.त्यानंतर घराच्या उजव्या बाजूस पाटावर गुडी उभी केली जाते .      
         
चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठहिंगओवामिरीसाखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारतेपित्ताचा नाश होतोत्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.