कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर राहताय?

 'या' गोष्टींची काळजी घ्या


                          आपण बराच काळ घराबाहेर असताना आरोग्याची काळजी घेणे जरा अधिक अवघड असते. परंतु, काही खबरदारी घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत, आपण ही समस्या सहजपणे सोडवू शकता.
● पुरेसे पाणी प्या : इतर पेयांच्या तुलनेत, पाण्यात कॅलरी नसतात. पाणी कॅलरी जाळण्यास देखील मदत करते. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी पाणी प्यायल्यामुळे आपली भूक देखील कमी होते. तहान शमवण्यासाठी आपण साखर असलेल्या पेयांऐवजी, पाणीही पिऊ शकता. यामुळे आपले शरीर दिवसभर हायड्रेटेड राहील. 
● पोटभर जेवा : सकाळी कमी कॅलरीचा सर्व विटॉमिन युक्त संतुलीत असहार पाहिजे. असे न केल्याने दिवसभर चिडचिड होते, आळशी व झोपेची भावना वाटते.दुपारी पोटभर जेवन जेवलेले कधीही चांगले. 
● हलके अन्न खा : बहुतेक लोकांना रात्री जास्त भूक लागते. दिवसाच्या तणावामुळे रात्रीच्या वेळी लोकांना चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत आपण रात्री चपाती आणि भात भरपूर खातो, ज्यामुळे जास्त कार्ब खाल्ल्यास वजन वाढते. त्यापेक्षा हलके खा.   
● साखर आणि मीठ असलेले पेय टाळा : रात्रीच्या वेळी अधिक साखर आणि मीठयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा पेय प्यायल्याने मधुमेह आणि उच्चरक्तदाब होण्याचा धोका वाढतो. याचा तुमच्या त्वचेेवर खूप वाईट प्रभाव पडतो आणि तुम्ही आणखी वृद्ध दिसू लागता. या पेयांऐवजी आपण कमी-सोडियमयुक्त पेयांची निवड करू शकता.