मोबाईल हॅकिंग

               आज व्हाट्सअप च्या माध्यमातून एक मेसेज खूप फिरत आहे त्यावरच हा ब्लॉग आधारित आहे आपण हि वाचा व इतरांनाही शेअर करा.
                    व्हाट्सअप वर काही लिंक शेअर करून त्यावर क्लिक करण्यासाठी सांगितले जात आहे त्यानंतर आणखीन एक खूप चांगला मेसेज व्हायरल होत आहे तो असा

🛑 *सावधान-सावधान*🛑

                काही दिवसा पासून अनेक गृप वर Online Movies (profilist) तसेच NetFlix Free अश्या दोन लिंक व्हायरल होत आहे. ह्या लिंक खतरनाक हॅकर च्या आहेत. लिंक ओपन केल्यावर गृप मधील सर्वांना ऑटोमॅटिक व आपण सदस्य असलेल्या सर्व गृप मध्ये आटोमॅटिक जात आहे म्हणून सर्वांनी ह्या दोन्ही लिंक ओपन करू नये तसेच इतरांना share करू नये.


आणि दुसरा मेसेज असा आहे


जर एखाद्याने चुकून message link click केली असेल तर खालील पर्याय वापरा Go to settings
Apps manager.
Online stream apps
Clear catch
Clear data
Force stop
Uninstall


       तर हे मोबाईल हॅक होणे म्हणजे नेमके काय? यासाठी आपणाला कोणती दक्षता घेतली पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत.


             कोरोना काळात मोबाईलचा वाढता वापर असलेने मोबाइल हॅकचे प्रमाण वाढले आहे मोबाईल हॅक झाल्यानंतर त्यातून वैयक्तिक माहिती सार्वजनिक होण्याचा तसेच ती चोरली जाण्याचा धोका असतो. मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट 'लिंक' (मालवेअर असलेल्या) नागरिकांना पाठविली जाते या लिंक वर क्लीक करण्यासाठी  अनेक आमिषे दाखवली जातात आणि आपले सुजाण नागरिक या अमिषा पोटी त्या लिंक वर क्लिक करतात आणि हॅकर्स आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र, बँकिंग डिटेल मिळवू शकतात.

तुमचा मोबाईल हॅक झाला आहे हे कसे ओळखाल?

@ मोबाइलमधील अ‍ॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा बंद होणे.

@ अचानक रीस्टार्ट होणे.

@ मोबाइल एकदम शटडाउन होणे.

मोबाइलमधून आपोआप एसएमएस पाठवला जाणे.

आपला मोबाईल  हॅकर्स पासून बचावासाठी काय काळजी घ्याल?

@ मेलमध्ये एसएमएस मध्ये आलेली अनोळखी लिंक उघडू नये.

मोबाइलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका.

एखादं अँटिव्हायरस इन्स्टॉल करा. 




  • आपल्याला ब्लॉग कसा वाटला काही बदल आवश्यक असल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा....