सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!

  दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व  कष्टपूर्ण आहे हे कळेल. 


दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.


दहा मिनिटे साधुसंन्याशासामोर बसा, आपल्याजवळील सर्वकाही  दान करून टाकावे असे वाटेल.


दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.


दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.


दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.


दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.


दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.


दहा मिनिटे शेतकरी/कामगार यांच्या समोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.


दहा मिनिटे सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल. 


दहा मिनिटे मित्रांसमोर बसा; स्वर्ग, स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल.