शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न कळणं, शिक्षण म्हणजे चंगळवादापासून दूर राहणं, शिक्षण म्हणजे स्वावलंबी होणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं..
शिक्षण नीरस नसावं, त्याचं ओझं वाटू नये, मुलांना आवडावं, गंमत यावी, भविष्यात उपयोगी पडावं, परीक्षेपुरतं केलं आणि विसरलं असं नसावं. प्रत्येक विषय मुलांच्या जीवनाशी आणि समाजाशी जोडलेला हवा.